*राज्यपाल मा. रमेशजी बैस व मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*
फलटण टुडे (मुंबई, ) :-
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षाचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ आज पासून म्हणजे दि. २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर याच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे आयोजित करत आहेत. या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन शुक्रवारी, २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेशजी बैस व मुख्यमंत्री मा. ना. एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते जांबोरी मैदान, वरळी येथे होणार आहे.
उद्घाटनानंतर या कार्यक्रमात पारंपरिक तलवारबाजी, दांड पट्टा इत्यादी खेळांचे प्रात्यक्षिकां सोबतच मुंबईकरांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक ठेवा असलेल्या २७ किल्यांच्या प्रतिकृती पाहण्याचा एक दुर्मिळ योग मिळणार आहे.
या क्रीडा महाकुंभामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारात पंजा लढवणे, मल्लयुद्ध, शरीर सौष्ठव, दंड बैठक, दोरी उड्या, पावनखिंड दौड, मल्लखांब व सांघिक खेळ प्रकारात लेझीम, लगोरी, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुगडी, ढोल ताशा पथक, विटी-दांडू व खो-खो अशा विविध १६ पारंपरिक खेळांच्या स्पर्धा मुंबईतील विविध २८ मैदानांवर होणार आहेत.
या स्पर्धेत जवळजवळ पाच लाख स्पर्धक सहभागी होत आहेत. तसेच स्पर्धेतील पारितोषिक विजेते खेळाडू व संघांना एकूण रोख रक्कम रु. २२ लाख ६२ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे