फलटण टुडे (फलटण दि. २० ) :-
सातारा जिल्हा अॅम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत वार्षिक सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता मुधोजी महाविद्यालय, मैदान, फलटण येथे होणार आहेत .
सदर स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा अॅम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पांडुरंग शिंदे व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत .
सदर स्पर्धा फलटण तालुका अॅथलेटिक्स असोसिएशन, फलटण यांच्या आयोजनात होत असून सदर स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा मार्गदर्शक तय्यप्पा शेंडगे यांनी केले आहे .