धर्म नगरी फलटणच्या शहर पोलीस निरीक्षक पदी नुकतीच हेमंतकुमार शहा साहेब यांची नियुक्ती झाली.शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे संगिनि फोरम कडुन स्वागत करुन शाल-श्रीफळ-मोत्याची माळ -जिनवाणी भेट देऊन साहेबांचा यथोच्चीत सत्कार अध्यक्षां अपर्णा जैन ,सचिव प्रज्ञा दोशी,खजिनदार मनिषा घडिया यांचे हस्ते संपन्न झाला.
संगिनी फोरमच्या माजी सचिव दिप्ती राजवैद्य यांनी प्रास्ताविक करून साहेबांचा परिचय करुन दिला व संगिनि फोरमच्या सामाजीक कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी माजी अध्यक्षां संगिता दोशी,निना कोठारी ,माजि सचिव पोर्णिमा शहा,माजी खजिनदार संगिता जैन,संगिनी सदस्या किशोरी शहा,जयश्री उपाध्ये,सारिका दोशी,सुरेखा उपाध्ये,
वृषाली गांधी ऊपस्थीत होत्या.
सत्काराबद्दल हेमंतकुमार शहा साहेब यांनी धन्यवाद व्यक्त करून संगिनी फोरमला सामाजिक कार्यात सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन करुन संगिनी फोरमच्या सामाजिक कार्या बद्दल प्रशंसा करुन शुभेच्छा दिल्या.