मुधोजी प्राथमिकच्या बालगोपाळांनी श्रीरामाच्या जयघोषात काढली प्रभात फेरी


फलटण टुडे वृत्तसेवा दि १८ :-
श्रीराम प्रभूंच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या फलटण नगरी मधील सर्वांचे दैवत असलेल्या श्रीराम प्रभूंच्या शिखर जीर्णोद्धार शुभारंभास फलटण शहर व तालुक्यातील भाविकांना आग्रहाचे निमंत्रणअयोध्या या श्रीरामाप्रभूंच्या जन्मभूमी मध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असून त्याच शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.20 वाजता श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट फलटण यांच्या माध्यमातून फलटण संस्थांचे अधिपती व माजी सभापती महाराष्ट्र विधान परिषद आ मा .श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते शिखर जीर्णोद्धार शुभारंभ सोहळा विधी पूर्वक करण्यात येणार असून.या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये फलटण शहर व तालुक्यातील सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ.ए.सो.चे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर,फलटण या प्रशालेमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व बालगोपालांनी श्रीराम प्रभूंच्या व विविध पारंपारिक पोशाखांमध्ये सहभागी होऊन आज सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करून श्रीराम प्रभूंच्या जयघोषाने सर्व आसमंत बालगोपाळांनी दुमदुमून सोडले ही प्रभात फेरी शहरातून मुख्य चौकातून श्रीरामाच्या जयघोषात पार पडली. यावेळी संपूर्ण वातावरण श्रीराममय व मंत्रमुग्ध केले प्रत्येक जण या बालगोपालांच्या प्रभात फेरीकडे कौतुकाने पाहत होता व शुभाशीर्वाद देत होते .

वरील प्रभात फेरीस शुभाशीर्वाद व प्रेरणा लाभली विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा.श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर,श्रीमंत यशोधराराजे उदयसिंह नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर ,प्राचार्य विश्वासराव मुगुटराव देशमुख, श्री.शरदराव विश्वासराव रणवरे,श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व चॅरिटीज ट्रस्ट फलटण तसेच मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर चेअरमन मु.प्रा.वि.फलटण व सर्व शाळा समिती सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे व या प्रभात फेरीस मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक श्री.रुपेश शिंदे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांच्या सहभागाने प्रभात फेरी मंगलमय वातावरणात संपन्न झाली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!