राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व इतर मान्यवर
फलटण टुडे (सातारा, दि. १२ ):-
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.
मुधोजी हायस्कूलच्या व्यंकटेश विभागामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांनी यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.
यावेळी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्यावर इयत्ता ११वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली व त्यांच्या महान कार्याची ओळख विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना करून दिली . तसेच इयत्ता ७ वी च्या विद्यार्थिनींनी तबला आणि पेटीच्या साह्याने सुंदर असे गायन यावेळी केले .
यावेळी प्रशालेचे ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य देशमुख डी ,सकाळ विभागातील ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विभागातील शिक्षक वृंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर वाकुडकर यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप लोंढे यांनी केले