फलटण-राज्य परिवहन महामंडळ (एस.टी)मध्यवर्ती कार्यालय मुंबई मार्फत राज्यात सर्व एस.टी.आगारात हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येत आहे.
राज्यांतील सर्व एस.टी.आगारात मे २०२३ ते एप्रील २०२४ अखेर स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.स्वच्छता अभियाना मधे राज्यातुन तिन आगारांचे नंबर काढण्यात येणार आहेत. प्रथम क्रमाकांस ₹ पन्नास लाख ,द्वितीय क्रमाकांस ₹ पंचविस लाख व तुतीय क्रमाकांस ₹ दहा लाख अशि बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रत्येक आगार ,बस स्थानके यांची चार राऊंड मधे केद्रींय समिती मार्फत पाहणी करण्यात येणार आहे.
फलटण आगारास नुकतीच तुतिय फेरीकरिता समीतीने भेट दीली. समीती मधे रा.प.रत्नागीरी विभाग नियंञक प्रज्ञेश बोरसे,ऊप यंञ अभियंता मुदुला जाधव,कामगार अधिकारी विलास चौगुले,स्थानीक प्रतीनीधी म्हणुन प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष प्रा.शिवलाल गावडे सर,पञकार प्रतीनीधी म्हणुन दैनीक स्थैर्य चे संपादक प्रसन्न रुद्रभटे याचां समावेश होता.
समितीने फलटण बस स्थानकाची पाहणी करुन समाधान व्याक्त केले.केद्रींय पाहणी समीतिचे फलटण आगार प्रशासनाच्या वतीने बुके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक,स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे, वरिष्ट लीपीक लहु चोरमले,कुलदीप चव्हाण,धिरज खुळपे ,बहुसंख्य कर्मचारी ऊपस्थीत होते.फलटण आगारातील सर्व अधिकारी,सर्व कर्मचारी यांनी स्वच्छता अभियानात ऊस्फुर्त पणे सहभाग घेतला.