विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
फलटण टुडे (बारामती ): –
बारामती शहरातील श्री शाकंभरी देवी मंदिरामध्ये श्री शाकंभरी नवरात्र महोत्सव चे आयोजन १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ च्या दरम्यान संपन्न होणार आहे या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मध्ये वालचंद नगर येथील शारदा महिला भजनी मंडळ , श्री गुरुकृपा महिला भजनी मंडळ श्रीराम महिला भजनी मंडळ,श्री वीरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन व देवी मंत्र पठण व सुरेखा बाचल व सहकारी यांचे श्री सूक्त पठण व २२जानेवरी रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठपणा निमित्त श्रीराम जप,२३ जानेवरी रोजी कलश व पादुका पूजन, सार्वजनिक रुद्राभिषेक सदरकर्ते माहेर चे आंगण भजनी मंडळ व भव्य पालखी सोहळा तर २५ रोजी गुरुकृपा त्रिमूर्ती पुरुष भजनी मंडळ व काशीवीश्वर महिला भजनी मंडळ यांचे देवी पठण व भजन होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी सदर कार्यक्रमास उपस्तीत राहण्याचे आवाहन नितीन डोईफोडे मुख्य मुख्य विश्वस्त श्री शाकंभरी नवरत्न महोत्सव यांनी केले आहे.
बारामती नगरीमध्ये सर्वसाधारणपणे १९५० देवीची स्थापना करण्यात आली. तिचे मूळ स्थान कर्नाटक स्थित बदामी येथील असून येत्या गुरुवारपासून सर्व भारतभर या देवीचे नवरात्र उस्तव साजरे केले जातात. गेल्या ७३ वर्षांपासून बारामती येथेही कोश्टीगल्ली येथे हे मंदिर स्थापन केले असून तेथे दरवर्षी या नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नऊ दिवसांमध्ये बारामती तालुक्यातील अनेक भाविक श्री शाकंभरी देवी ची पूजा विविध रुपात करतात तो मान त्या त्या मान्यवरांना दिला जातो. या दिवसांमध्ये विविध प्रकारचे भजन कीर्तनाचे कार्यक्रम योजीले जातात.
सालाबाद प्रमाणे वर्षातून फक्त एकच दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक २४ जानेवारी रोजी सायं ७ वाजता श्री शाकंभी देवीची पालखी वाजत गाजत बारामती शहरातून काढली जाते त्यावेळी सर्व भाविकांमार्फत देवी आपल्या दारी आली आहे या भूमिकेतून देवीची आरती ओवाळून, फुले वाहून आशीर्वाद घेतले जातात. भिगवन चौक येथे दुर्गा देवी समोर देवीची यथासांग महाआरती आयोजित केली जाते.
उत्सव काळात मूळचे बारामतीकर राज्यातून श्री शाकंभरी देवीचे दर्शनासाठी सहकुटुंब
येत असतात
बारामती येथे श्री शाकंभरी मंदिराची स्थापना माघ || शुद्ध वसंत पंचमी या दिवशी झाली आहे त्यानिमित्त यावर्षी देखील बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी बारा वाजता श्री शाकंभरी देवीची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.