फलटण टुडे (बारामती ) :-
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती (शुक्रवार १२ जानेवरी) उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी तहसीलदार गणेश शिंदे, बारामती नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे ,बारामती तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे, विश्वस्त दिलीप ढवाण,मनोज पोतेकर, प्रदीप शिंदे, दीपक बागल,ऍड विजय तावरे, पोपटराव वाबळे व जिजाऊ सेवा संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती ढवाण ,माजी अध्यक्षा हेमलता परकाळे ,विजया कदम व माजी नगराध्यक्षा जयश्री सातव व छाया कदम,शारदा खराडे,कल्पना शिंदे, नयन शहा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षा ज्योती लडकत आदी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते.
या प्रसंगी बाल शिवाजी व जिजाऊ माता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी करून जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी जिजाऊ वंदना साजरी केली व वैमानिक क्षेत्रात निवड झालेली कु. साक्षी घाडगे हिच्या पालकांचा व विधी क्षेत्रातील कार्याबद्दल ऍड सुप्रिया बर्गे यांचा सत्कार व शिवनगर विद्या प्रसारक मंडळ येथील अनाथ विद्यार्थ्यांनी ला पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य चा धनादेश देण्यात आला.
जिजाऊ सेवा संघाची नवीन कार्यकरणी चा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार स्वाती ढवाण यांनी मानले .