आणि ५० वर्षांनी पुन्हा भेटले कृषी मित्र

गोल्डन ज्यूबली स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कृषी पदवीधर बॅच चे व माजी विद्यार्थी कृषी विकास प्रतिष्ठान मध्ये स्नेहमेळावा निमित्त एकत्र आले असताना

फलटण टुडे (बारामती ): –
१९७३ ते १९७७ मधील कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी पदवीधर बॅच यांचा कुटूंबीयसहित स्नेहमेळावा कृषी विकास प्रतिष्ठान येथे रविवार ०७ जानेवरी २०२४ रोजी संपन्न झाला.
 या प्रसंगी कृषिविकास प्रतिष्ठान चे विषवस्त विष्णुपंत हिंगणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे ,ग्रुप एडमिन उमरसिंह परदेशी इंदापूर बारामती चे आयोजक बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्यधिकारी काशिनाथ जळक व प्रतापसिंह जाचक,श्रीरंग भोसले, पोपटराव भांडवलकर, एम,के नागवडे, महादेव माने, रमेश जगताप,
आदी आयोजक व मान्यवर सर्व माजी विद्यार्थी, कुटूंबिय उपस्तीत होते.
 सर्व माजी विद्यार्थी विविध नोकरी ,उदयोग मधून सेवा निवृत्त झाले आहेत परंतु शेती हा प्राण असल्याने आजही वयाच्या ७० नंतर अनेक जण शेती करीत असल्याने खऱ्या अर्थाने कृषी विभागातील शिक्षण आजही उपयोगी पडत आहे व सर्व जण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असून एकमेकास सहकार्य, वेळ देत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे प्रास्ताविक मध्ये काशिनाथ जळक यांनी सांगितले.
अत्याधुनिक शेती व टिकणारी मैत्री या विषयावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कृषी विकास प्रतिष्ठान मधील शेती व त्यामधील विविध प्रयोग यांची माहिती घेतली , जुन्या मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम व चांडाळ चौकटी मधील कलाकार यांची ग्रामसभा यांनी स्नेहमेळाव्यात हास्याची मेजवानी दिली.
एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत राहू, भेटत राहू असे वचन देत निरोप घेऊन गोल्डन ज्यूबली स्नेहमेळावा संपन्न झाला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एम के नागवडे यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!