ग्रामीण सह शहरी भागातील महिलांचा वाढता कल
फलटण टुडे (बारामती ): –
अत्याधुनिक व फास्ट काळात वेळ आणि पैसा वाचावा आणि सर्व काही एका छताखाली उपलब्ध व्हावे व समाधानी आणि संतुष्ट ग्राहक मिळावेत या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बारामती व मुक्ताई टेक्सटाईल यांनी सुरू केलेल्या’ रोटरी पैठणी महोत्सव २०२४ ‘ च्या उपक्रमास महिला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवार ०६ जानेवारी रोजी मा. नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा ज्योतिताई लडकत,जिजाऊ सेवा संघाच्या मा.अध्यक्षा हेमलता परकाळे,राष्ट्रीय सेविका समिती च्या अध्यक्षा स्मृती इंगळे,जैन महिला मंडळ अध्यक्षा नयन गांधी व रोटरी क्लब च्या अध्यक्षा दर्शना गुजर , सेक्रेटरी अभिजित बर्गे व मुक्ताई टेक्सटाईल चे संचालक सचिन चवरे, इतर प्रायोजक इतर रोटेरियन सदस्य उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण कार्य करीत महिला साठी उत्तम कार्य रोटरी क्लब करीत असल्याचे पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.
रोटरी क्लब ने बारामती परिसरात वृक्षारोपण रक्तदान शिबिर विविध रुग्णालय यांना रुग्णासाठी अत्यावश्यक मशीन प्राप्त करून दिले व या पुढेही सामाजिक काम अविरत पणे करीत राहणार असल्याचे रोटरी क्लब च्या अध्यक्षा दर्शना गुजर यांनी सांगितले .
पहिल्या भाग्यवान विजेत्या मालती गालिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले आभार प्रदर्शन रोटेरियन अभिजित बर्गे यांनी मानले.