फलटण टुडे (फलटण) : –
आयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे फलटणचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे रविवार दि. १४ जानेवारी रोजी सर्व फलटणकारांनी एकत्रित येऊन राम नामाचा जप व राम रक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे सर्वांसाठी रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता रामनामाचा जप व राम रक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन कागदावर 108 वेळा “श्रीराम जय राम जय जय राम” असे लिहून त्याखाली स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहायचा आहे. आयोध्या येथे होणाऱ्या समारंभाच्या पूर्वी सदरील रामनाम जपाचा रामकुंड पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.