फलटण टुडे (सातारा दि. 8 ): –
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापट्टूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी क्रीडा विभागाच्या https//sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे यावर अर्ज करावेत.