फलटण टुडे बारामती: –
दिऊ या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या मल्टी स्पोर्टस् बीच गेम राष्ट्रीय फेस्टिवल मध्ये बारामतीच्या साहेबराव ओहोळ यांची पंच म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या स्पर्धा भारतीय स्पोर्टस् मिनिस्ट्री आणि युथ अफेर्स यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या स्पर्धेचे उदघाट्न केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर, दिव दमन नगर हवेलीचे चे राज्यपाल दादरा व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
या स्पर्धा 4 जानेवारी ते 11 जानेवारी ला संम्पन्न झाल्या, या स्पर्धेत महाराष्ट्र मधून पौर्णिमा तेली आणि साहेबराव ओहोळ यांची टेक्निकल ऑफसर (पंच )निवड झाली होती. साहेबराव ओहोळ हे बारामती मध्ये पिंच्याक सिलात खेळाचे प्रशिक्षण गेली बरा वर्ष देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा खेळले आहेत, साहेबराव ओहोळ यांनी गोवा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ही काम पाहिलेले आहे.
योद्धा स्पोर्टस् क्लब च्या माध्यमातून खेळाडूंना चांगला स्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांच्या स्पर्धा ही खेळाडूंना दिल्या जातात साहेबराव ओहोळ यांना किशोर येवले सर इंडियन पिंच्याक सिलाट चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सन्मानित केले