फलटण टुडे वृत्तसेवाः –
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाची जलतरण खेळाडू कु.रुचिता कदम ची शिवाजी विद्यापीठ जलतरण संघामध्ये निवड झाली असून. दक्षिण पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धा या एस.आर. एम.
विद्यापीठ,चेन्नई येथे होणार आहेत.
कु.रुचिता कदम हिच्या निवडीबद्दल व तीला प्रशिक्षण देणेऱ्या प्रशिक्षक यांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन नियामक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य , प्रशासन अधिकारी अरविंद निकम,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.