फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी): –
केंद्र सरकारने वाहन (गाडी) चालक मालक यांच्याकडून अपघात झाल्यास अपघाताचे स्वरूप पाहून १० वर्ष कैद व १० लाख रुपये दंड का कायदा केला आहे. तो कायदा रद्द होणे साठी व त्यांचा निषेध म्हणून एक दिवसीय आंदोलन बारामती एमआयडीसी मधील पेन्सिल चौक येथे करून तालुका पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जयहिंद चालक-मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान, बारामती तालुका अध्यक्ष दादा पिसाळ व उपाध्यक्ष महेश खवळे, शशी जाधव व इतर पदाधिकारी व बारामती एमआयडीसी मधील विविध कंपन्यांचे गाडी चालक ,मालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
सदर कायद्याने सामान्य व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या चालक व वाहक यांना विनाकारण आर्थिक त्रास देण्याचा केंद्र सरकारचा हेतू असून त्यामुळे चूक नसतानाही चालक वाहक यांना कैद व दंड होणार आहे त्यामुळे सदर कायदा रद्द करावा अन्यथा बेमुदत बंद करण्याचा इशारा जयहिंद चालक-मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरिफ खान यांनी सांगितले.
सदर कायद्या मुळे चोर सोडून संन्याशाला पकडणे सारखे असून देशातील सर्वच अपघात केवळ चालक व मालक यामुळे होत आहेत असा अर्थ होतो व चालक मालक बदनाम करण्याचे सदर कारस्थान असून या मुळे मोटार वाहतूक व्यवसायाकडे कोण वळणार नाही व बेरोजगारी वाढेल असे मत बारामती तालुका अध्यक्ष दादा पिसाळ यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या बारामती एमआयडीसी परिसरातून ५०० चालक मालक यांनी आंदोलनात सहभाग घेतला असून बंद मध्ये तालुक्यातील सर्व संघटना सहभाग घेणार असल्याचे उपाध्यक्ष महेश खवळे व शशी जाधव यांनी सांगितले.