फलटण टुडे वृत्तसेवा : –
आय टी एस प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण विद्यालयास ‘स्मार्ट शाळा ‘(‘Smart School’ ) चे मानांकन मिळाले आहे, हे फलटण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला अत्यंत भूषणावह अशी गोष्ट आहे. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा या संस्थेमार्फत तपासण्यात आला असता हे नामांकन मिळण्यास हे विद्यालय वरील निकषास पात्र ठरले आहे . त्यामुळें हे नामांकन या प्रशालेस देण्यात आले.
इंडियन टॅलेंट सर्च (Indian Talent Search )ही संस्था सबंध महाराष्ट्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात काम करते. त्या अनुषंगाने वरील संस्थेच्या ‘Smart School’ निवड समितीने तयार केलेल्या निष्कर्ष अहवालात आपल्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेची निवड करण्यात आली आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.
फलटण तालुक्यातून विविध भागातून विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत . या शाळेस १५० वर्षाची परंपरा लाभलेली आसून अत्यंत जुनी व दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था असल्यामुळे ‘Smart School’ या उपक्रमात या शाळेची निवड झाली असून मुधोजी हायस्कूल या प्रशालेस ‘Smart School’ हा पुरस्कारासह रोख रक्कम रुपये 25,000/- व सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन प्रशालेचे प्राचार्य व स्पर्धा परीक्षे संबंधित काम करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.दीपक चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य ,प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम ,तसेच मुधोजी हायस्कूल स्कूल कमिटीचे सर्व सदस्यांनी व इतर मान्यवरांनी प्रशालेचे प्राचार्य ,उपप्राचार्य ,पर्यवेक्षक व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले .