फलटण टुडे (बारामती ):-
इंदापूर तालुक्यातील निरवांगी
ग्रामपंचायत च्या सरपंच पदी मनिषा पोळपाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी सरपंच कामीनी पोळपाटील यांनी राजीनामा दिल्यान रिक्त झालेल्या पदाकरीता मनीषा पोळपाटील, याचा एकमेव अर्ज आल्याने मनीषा पोळपाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधीकारी शहाजी राखुडे , तलाठी चंदकांत सोनवणे, ग्रामसेवीका विजयमाला रणवरे यांनी निवडणूक कामकाज पाहिले.
या प्रसंगी कृषी उत्त्पन्न बाजार समिती चे संचालक दशरथ पोळपाटील, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पोळपाटील व
मा. सरपंच आजिनाथ काबंळे पोलीस पाटील बापूराव रासकर, उपसरपंच वैभव जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, संतोष पोळ पोपट काशीद,शरद जाधव, रवींद्र पोळ पाटील मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
लोकनेते कै. छगनराव पोळ पाटील यांच्या मनीषा या स्नुषा असून
शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवू व विकास कामांमध्ये निरवांगी ग्रामपंचायत अग्रेसर ठेवणार असल्याची अशी प्रतिक्रिया मनीषा पोळ यांनी दिली