सुदर्णपदक विजेता आर्चरी संघ
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण /बारामती):-
18 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 रोजी पंजाबमधील भटिंडा येथे नुकत्याच पार पडलेल्या साऊथ वेस्ट झोनल गेम्स पारपडले यामध्ये दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची बीसीए सायन्स ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा विनय गाटे हिने आर्चरी कंपाउंड प्रकारात पंजाबमधील भटिंडा येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले .
ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. ऋतुजा आणि तिच्या टीमने केवळ अपवादात्मक कौशल्य आणि खिलाडूवृत्ती दाखवली नाही, तर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांना आगामी राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांमध्येही स्थान मिळवून दिले आहे.
त्यांची ही कामगिरी केवळ शैक्षणिक संस्थेला व तीचं मुळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला अभिमानाची गोष्ट आहे. तसेच संपूर्ण व्ही पी कुटुंबाने ऋतुजाच्या समर्पणाचे आणि विजयाचे कौतुक केले.
तसेच विधान परिषदे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण – कोरेगाव विद्यानसभेचे आमदर मा. दीपक चव्हाण , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवरींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .