फलटण टुडे (बारामती दि 22): –
मैदानी खेळ खेळा, निरोगी रहा,
दिखाऊ न राहता टिकाऊ रहा व कामापूरता सोशल मीडियाचा वापर करा तरच अभ्यासात व जीवनात यश मिळेल असे प्रतिपादन बारामती चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव च्या उदघाटन प्रसंगी गणेश इंगळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी संदिप जायपत्रे, संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे , निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख क्रिडाशिक्षिका प्रतिभा चौधर ,व पालक ,विद्यार्थी उपस्तीत होते.
संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील राज्य, जिल्हा, विभाग पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली.
मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी शपथ दिली.
खेळाविषयी गीतावर विद्यार्थ्यांनी सांघिक सुंदर नृत्याविष्कार सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणील राठोड व रीनाज मिस यांनी केले,तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केले.