फलटण टुडे (फलटण ) :-
श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी प्रामुख्याने गरजूंसाठी आरोग्य निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओलॉजी( हृदयरोग) तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, युरोलॉजिस्ट (मूत्राशय तज्ञ),पाठदुखी, मणक्याचे आजार तज्ञ, हाडाचे तज्ञ (आर्थोलॉजिस्ट), मधुमेह तज्ञ,लहान मुलांचे तज्ञ,स्त्री रोग तज्ञ या आजाराची तपासणी केली जाणार आहे. या शिबिराचा शेकडो नागरिकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत विश्वजीतराजे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरातूनही रक्तपेढी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे मित्र समूहाच्या वतीने सांगण्यात आले.तरी तालुक्यातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वजीतराजे नाईक निंबाळकर मित्रसमुह यांच्यावतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी सकाळी ठीक ९ वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच समाज उपयोगी कार्यक्रम घेतल्यामुळे, समाजातील विविध स्तरातून, प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याची भावना व्यक्त होत आहे.