फलटण टुडे (बारामती ): –बारामती तालुक्यातील वंजारवाडी मधील चौधरवस्ती येथील रहिवाशी हनुमंत पोपट गाढवे यांच्या घराला आग लागून घर आगीत जळून खाक झाले परंतु वंजारवाडी ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत मदतीचा हात पुढे केला.
शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी हनुमंत गाढवे यांच्या घरामध्ये सकाळी १० च्या सुमारास अचानक आग लागली व वाऱ्या च्या वेगाने आगीने सर्व घर बसमसाथ केले सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही.
परंतु रोजच्या वापरातील सर्वच वस्तू आगीत जळून खाक झाल्या.गाढवे पती पत्नी एमआयडीसी मध्ये मजूर म्हणून काम करतात व मुले जिल्हा परिषद शाळे मध्ये शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वंजारवाडीचे लोकनियुक्त सरपंच जगन्नाथ वणवे यांनी गावातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले त्यानुसार गावातील दानशूर व्यक्तींनी जवळपास ६५००० हजार रुपयांची मदत केली व काही अत्यावश्यक संसार उपयोगी वस्तू घेऊन दिल्या ,यामध्ये गावकर्यांसोबत स्नेहबंध प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान च्या सदस्यांनी मोलाची मदत केली.
या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच जगन्नाथ काका वणवे , शरद चौधर, शशिकांत चौधर , मेजर अनिल कायगुडे, पिंटू सावंत उपस्थित होते.अत्याधुनिक व तंत्रज्ञान,प्रगत युगात माणुसकी जिवंत आहे हे वंजारवाडी मधील नागरिकांनी दाखविले या मुळे समाधान मिळाल्याचे हनुमंत गाढवे यांनी