फलटण टुड (बारामती प्रतिनिधी ):-
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदिर पिंपळी येथील
सिद्धी बोरा हिची दिल्ली येथील एस. जी.एफ. आय. (SGFI )च्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी सीबीएससी वेल्फेअरकडून निवड करण्यात आली आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी सीबीएससी वेल्फेअर कडून निवड करण्यात आलेली आहे दिनांक १६ डिसेंबर २३ डिसेंबर या कालावधीमध्ये छत्रसाल स्टेडियम मॉडेल टाउन दिल्ली येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण भारत देशातून सर्व राज्याच्या टीम या सहभागी होणार आहेत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघामध्ये सीबीएससी वेल्फेअर यांच्या राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे विद्या प्रतिष्ठानच्या सिद्धी बोरा हीची सतरा वर्ष आतील वयोगटांमध्ये ५६ ते ६० वजनगटात निवड झालेली आहे.
या स्पर्धेकरता तिला क्रीडा शिक्षक प्रसाद रणवरे, मंदार कळसकर , व साधना खोमणे बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख रवींद्र कराळे यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या निवडीबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.