मुधोजी महाविद्यालयाचा तिरंदाजी खेळाडू अजित श्रीराम याची शिवाजी विद्यापीठ तिरंदाजी संघामध्ये निवड झाली. दक्षिण पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धा ह्या गुरुकाशी विद्यापीठ,भटिंडा या ठिकाणी आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नियमक मंडळाचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम ,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.