*मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद*

फलटण टुडे (फलटण) :-
शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुधोजी कनिष्ठ विभागामार्फत दोन दिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रमआयोजित केले होते या दोन्ही उपक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठयासंख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. संजय वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार व शनिवार दिनांक 15 व 16 डिसेंबर या दोन दिवशी फूड फेस्टिवल व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले त्यामध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या कला , वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यामार्फत एकूण 34 स्टॉल लावण्यात आले होते . सर्व स्टॉलला खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये चिकन बिर्याणीचे स्टॉल हे मुख्य आकर्षण होते.

शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .एच. कदम , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दीक्षित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य श्री.संजय वेदपाठक यांनी कनिष्ठ विभागामार्फत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्यांनी मनोरंजन ही मनाची गरज असल्याचे सांगितले तसेच अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन
करण्याची संधी त्यांना मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यासपीठामुळे मिळत आहे त्यामुळे या सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व ज्यांना या उपक्रमात सहभाग घेता आला नाही त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 तसेच मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचे 
उप प्राचार्य आणि सर्व स्टाफने दोन्ही उपक्रमांचे अत्यंत शिस्तबद्ध , निटनेटके व यशस्वी नियोजन केल्याबद्दल मा. प्राचार्य यांनी ज्युनि. कॉलेज स्टाफचे अभिनंदन केले व पुढील उपक्रमांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दाखवीत व पारंपरिक नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली.

या उपक्रमासाठी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच. कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.संजय दीक्षित , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.संजय वेदपाठक , महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता अकरावी व बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी, व विध्यार्थिनी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!