फलटण टुड (बारामती ): –
विद्या प्रतिष्ठान समोरील बारामती एमआयडीसी हद्दीतील खाजगी पेट्रोल शेजारील व श्रीकृष्ण बेकरी ते मुक्ताई टेक्सटाईल समोरील,व हॉटेल संदीप कॉर्नर येथील खाजगी अतिक्रमणे काढावीत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने सूरज बाळासाहेब चौधर, ऍड अमोल गावडे, धनंजय आटोळे ,संतोष पडळकर आदी विद्यार्थ्यांनी बारामती एमआयडीसी कार्यालय कडे केली आहे.
खाजगी पेट्रोल पंप ते खरेदी विक्री पेट्रोल पंप परिसर व मुक्ताई टेक्सटाईल व बँक ऑफ महाराष्ट्र परिसरात मोठ्या प्रमाणावर खाजगी शिक्षण अकॅडमी ,क्लासेस आहेत त्यांचा कोणताही त्रास विद्यार्थी किंवा नागरिकांना नसतो परंतु हॉटेल चालक, चायनीज विक्रेते , खाजगी फळे, भाजीपाला, चहा विक्रेते आदींनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी आणि नागरिक यांना येताना जाताना व वाहने चालविताना गर्दीतून वाट काढत व कसरत करीत चालावे लागते
सकाळी क्लासेस, शाळा भरताना व सांयकाळी सुटताना मोठ्या प्रमानावर गर्दी होत असते त्यामुळे अपघाताची संख्या सुद्धा वाढत आहे
त्यामुळे एमआयडीसी प्रशासन ने लवकरात अतिक्रमण काढावे व वाहतुकीस रस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे