फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ.दिपकराव चव्हाण यांनी केलेल्या मागण्यांचा नागपूर हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करुन त्यासाठी ४९.३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर* यांनी दिली आहे.
सदर मंजूर कामांमध्ये फलटण – काशिदवाडी – नांदल रत्स्यावरील दहावा घाट येथे छोटा पूल बांधकाम १ कोटी ८९ लाख रुपये, तरडगाव – सासवड – घाडगेवाडी – शेरेचीवाडी ते प्रजिमा ९, प्रजिमा ८६ मलवडी गावाजवळ छोटा पूल बांधणे १ कोटी ९६ लाख रुपये, आसू ते सोनगाव रस्ता ग्रामा १२९ सुधारणा करणे ५० लाख रुपये, प्रारामा १५ ते कापडगाव – आरडगाव – हिंगगणगाव रस्त्यापैकी कापडगाव ते आरडगाव कमान रस्ता रुंदी करण व सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये, पाडेगाव – रावडी – मुरुम – जिंती – सोमंथळी – गोखळी – आसू रस्ता प्रजिमा ६ सोमंथळी जवळ जोड रस्त्यासह संरक्षक भिंत बांधणे २ कोटी रुपये, मेखळी – गोखळी – गुणवरे – निंबळक – पिंप्रद ते प्ररामा १५, प्रजिमा ११ गोखळी बाजार पेठ काँक्रिटीकरण सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये, तरडगाव – सासवड – घाडगेवाडी रस्त्यापैकी सासवड ते घाडगेवाडी रस्ता सुधारणा करणे २ कोटी ७५ लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग ७ ते पवारवाडी – हणमंतवाडी – मुंजवडी प्रजिमा १३ पैकी हणमंतवाडी ते मुंजवडी रस्ता सुधारणा करणे २ कोटी ७५ लाख रुपये, तरडगाव – सासवड – घाडगेवाडी – शेरेचीवाडी ते प्रजिमा ८६ मध्ये तरडगाव जवळ छोट्या पुलाचे बांधकाम २ कोटी ५० लाख रुपये, प्रजिमा ९ ते फडतरवाडी – सोमंथळी (जुनी रेल्वे लाईन) सोमंथळी जवळ जोड रस्त्यासह पुलाचे काम २ कोटी ५० लाख रुपये, तरडगाव ते पाडेगाव रस्ता इजिमा ११ सुधारणा १ कोटी रुपये, चव्हाणवाडी ते प्ररामा १५ (चांदोबाचा लिंब) रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, येळेकाळे वस्ती ते पाडेगाव फार्म रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, भुरकरवाडी ते हिंगणगाव रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, धूळदेव ते भिवरकरवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, पवारवाडी ते शिंदेनगर रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, निंबळक – शेरेवस्ती ते साठे रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, ढवळेवाडी ते फलटण आसू रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, ढवळ ते पिराचीवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, मलवडी ते बरकडेवस्ती रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, भाडळी खु|| ते भवानीदेवी मंदिर दुधेबावी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, गोखळी ते गीते बंधारा रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, गुणवरे ते मांगोबामाळ रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, ग्रामा ७३ ते लिफ्ट फाटा सरडे रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, कोऱ्हाळे ते आळजापुर रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, शिंदेनगर १३ दारे ते देशमुखवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, जिंती – फलटण – निरगुडी – निढळ – कुरवली – औंध २/५०० ते ७/०० रस्ता सुधारणा करणे ५ कोटी रुपये, जिंती – फलटण – निरगुडी – निढळ – कुरवली – औंध ७/०० ते १०/०० चौधरवाडी ते शेती शाळा रस्ता सुधारणा करणे ३.५ कोटी रुपये, सोळशी – करंजखोप – सर्कलवाडी – राऊतवाडी – अनपटवाडी – वाठार रस्ता इजिमा ६९ पैकी राऊतवाडी ते अनपटवाडी रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, इजिमा ६८ करंजखोप गावाजवळ सुधारणा करणे ५० लाख रुपये, रामा १३९ ते जाधववाडी, दाणेवाडी रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, पिंपोडा साळुंखेवस्ती ते धनगरवाडी ग्रामा १२ सुधारणा करणे ७५ लाख रुपये आणि सोळशी ते रणदुल्लाबाद ग्रामा ४ सुधारणा करणे ७५ लाख रुपये.
—————————–