फलटण टुडे(फलटण दि. १४ ):-
भारती विद्यापीठातर्फे सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण ची विद्यार्थिनी गायत्री अनिल वेलणकर हिने इयत्ता ७वी इंग्रजी- एन्ट्रन्स् परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
गायत्री वेलणकरला प्राचार्य बाबासाहेब गंगवणे पर्यवेक्षक व्ही जे शिंदे व सागर भोईटे , अमोल सपाटे
सचिन धुमाळ ,सौ.सोहनी सस्ते, कु.सुषमा घोरपडे , कु.संगिता कदम , शुभदा अगवणे या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
गुणवंत विद्यार्थीनीं व संबंधित विषय मार्गदर्शक शिक्षक यांचे विधान परिषदेचे मा.सभापती तथा विद्यमान विधान परिषद आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,प्रशासनाधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , पर्यवेक्षक शिंदे व्ही. जे . , जाधव जी.ए., पर्यवेक्षिका सौ. सुनिता माळवदे , ज्युनिअर चे उपप्राचार्य देशमूख ज्ञानदेव , प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी . अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.