पोलिसांचा दाखवला रिपोर्ट
फलटण टुडे वृत्तसेवा (नागपूर दि. १३ ): –
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मोठा दावा केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवशेन सुरु आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. आज छगन भुजबळ यांनी आज मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे.
मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा रिपोर्ट आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळांनी विधानसभेत रिपोर्ट देखील दाखवला. यामुळे महाराष्ट्रच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
भुजबळ नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले, मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मी आता भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे पाटील म्हणाले. अचानक आपली पोलीस सुरक्षा वाढवली, वरुन इनपूट आहे.
एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळांचा कार्यक्रम करतो, असे जरांगे म्हणाल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला. भुजबळ म्हणाले माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रकाश सोळुंखेंच झालं. संदीप क्षिरसागर यांचं देखील झालं. माझ सुद्धा होइल, असे छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.
कालपासून पोलसांची सुरक्षा वाढली. मी विचारलं तर मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. मारा हरकत नाही, पण हे जे सुरु आहे. हे बरोबर नाही मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या पण ही झुंडशाही थांबवा, असे भुजबळ म्हणाले.