फलटण टुडे (सातारा, दि. १३ ): –
जिल्ह्यातील युवा शेतकरी अतुल डेरे, कवठे ता. वाई व विजय काळे, मालदन ता. पाटण यांच्या कृषी क्षेत्रातील कामाची दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी ऑफ इंडिया पुरस्काराने ८ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे गौरवण्यात आले. त्याप्रत्यर्थ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा कार्यालयाने त्यांचा सत्कार केला
अतुल डेरे यांनी गटशेतीच्या माध्यामातून सेंद्रीय शेती करतात तसेच त्यांनी पिक पध्दतीमध्ये उस, हळद, आले, केळी इ. पिकांना स्वयंचलीत पध्दतीने सिंचन व खत व्यवस्थापन करतात. ते कृषि क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष असून ते कंपनीच्या माध्यामातून भागातील शेतकरी यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात तसेच त्यांना राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
विजय काळे यांनी विषमुक्त सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत व गूळ निर्मिती तसेच अन्य उत्पादनाचा निर्मिती उद्योग मालदन ता. पाटण येथे उभा केला सेंद्रीय आहे ते रॉयल गांडूळ खत नावाने गांडूळ खत विक्री करतात. ते भागातील शेतक-यांना वेळोवेळी सेंद्रीय शेतीबदल मार्गदर्शन करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यत विविध पुरस्कारांनी राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर गौरवण्यात आले आहे.