फलटण टुडे (सातारा, दि.12 ): –
राज्यामध्ये गुरव समाज्याच्या सर्वागिन विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विरशैव लिंगायत समाज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळातंर्गत उपकंपनी म्हणून जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या दोन्ही महामंडळाचे जिल्हा स्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त व विकास महामंडळ , डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग दुसरा माळा, जुना एम. आय. ङि सी. रोड बाँम्बे रेस्टॉरन्ट उड्डान पुलाजवळ , सातारा, दुरध्वनी क्रमांक 02162-295184 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थाप, ए.पी . माने यांनी केले आहे.