फलटण टुडे (सोलापूर ) :-
येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती सोलापूर तथा सोनार समाज संघटना सोलापूर यांचे वतीने दुधनी येथील सोलापूर 24 तास न्युज चॅनेलचे मुख्य संपादक श्री वीरभद्र पोतदार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करून श्री अरुण राव पोतदार साहेब जी एस टी ऑफिसर मुंबई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला . पांचाळ सोनार समाजातील 105 कर्तृत्ववान आणि लक्षवेधी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध सामाजिक बांधिलकी पुरस्काराने दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी विजापूर रोड वरील निर्मिती लॉन्स येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. प्रा डॉ चंद्रकांत पोतदार कोल्हापूर , प्रमुख अतिथी कराड येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री आनंदराव पालकर , तसेच उद्योगपती सर्वंश्री भारत कारीकर सोलापूर , सुरेशराव पंडित कोल्हापूर / बार्शी , शंकरराव पोतदार अरग , अनिलभाऊ वाशिंबेकर करमाळा , कृष्णकुमार पोतदार पुणे ,अमोल महामुनी जेऊर , अविनाश पंडित उस्मानाबाद , संजयजी बानकर इंदापूर , संजय आष्टीकर , निलेशजी धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वीरभद्र पोतदार यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , श्री वीरभद्र पोतदार यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .