फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी ) : –
राजस्थान मधील स्वर्गीय सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले त्याचा निषेध म्हणून शनिवार ०९ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व राजस्थान व्यापारी बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी बारामती तालुक्यातील सर्व राज्यस्थानी व्यापारी बांधव व माँ. कामधेनू गोशाळा ग्रूप बारामती चे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक पांडकर, सुधाकर पांढरे, दीपक पेशवे, विनोद पवार मा उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव व माँ. कामधेनू गोशाळा ग्रुप चे प्रवीण सिंग राठोड, जगमल सिंग राजपूत, पुनम सिंग राव, नरेश प्रजापती, पहेलाज देवासी , काळूसिंह राजपूत, मोतीराम चौधरी ,नरेश चौधरी
दुर्गाराम चौधरी, राजुशेठ चौधरी ,ताराराम देवासी व इतर पदाधिकारी उपस्तीत होते.
सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५डिसेंम्बर रोजी भर दिवसा राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती सुखदेव सिंग राष्ट्रीय करणी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राजपूत समाजाचे मोठे नेते होते व समाजासाठी त्यांचा मोठे योगदान होते तसेच राज्यस्थान मधील इतर समाजासाठी सुद्धा त्यांचे कार्य म्हतपूर्ण होते.
ज्यांनी हत्या केली त्या हत्यारला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मां कामधेनू गोशाळा ग्रूप बारामती यांच्याकडून करण्यात आली .