फलटण टुडे (सातारा दि. 7 ) : –
पादत्राणे दुरुस्त करणाऱ्या व्यावसायीक यांचे संरक्षण तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत 100 टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचे स्टॉल व रुपये 500 चे अनुदान दिले जाते.
या योजनेच्या लाभासाठी व अधिक माहितीसाठी डॉ.बाबासोहब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, जुनी एम.आय.डी.सी सातारा या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) विहीत नमुन्यात अर्ज करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.