राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा आज राजभवन येथे शुभारंभ झाला.
राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – २ या उपक्रमांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.