राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या जनहित प्रतिष्ठानच्या मूली व त्यांचे मार्गदर्शक कोच सचिन नाळे
फलटण टुडे (बारामती दि २ ):-
१ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२३ रोजी ठाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली श्री विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-कुमारी गट सुवर्ण मोहत्सवी मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. या कबड्डी स्पर्धेत जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या सात खेळाडूंची निवड झाली आहे.
वरील स्पर्धेसाठी कु. मधुरा कुंभार, कु.ज्योतिर्मयी शिंदे, कु.वैष्णवी साबळे, कु.समृद्धी वळकुंदे, कु.स्वरांजली जाधव, कु.स्वराली जाधव, कु. संचिता देवकर अशी निवड झालेल्या सात खेळाडूंची नावे आहेत
तसेच वरील खेळाडूंना मार्गदर्शन करणारे एन.आय. एस कोच बारामती येथील जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे क्रीडा शिक्षक, नॅशनल कबड्डी खेळाडू तथा बारामती तालूक्यातील डोर्लेवाडी गावचे सचिन नाळे यांची नंदुरबार जिल्ह्याच्या मुलींच्या कबड्डी संघाला प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
सचिन नाळे यांच्या गेल्या अकरा वर्षातील कबड्डी क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्याचे कबड्डी संघटनेचे सचिव, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक मा. बजिरंग परदेशी, कार्यवाहक मा. राजेंद्र साळुंखे, कार्यालयीन सचिव मा. हरिभाऊ धुमाळ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर नंदूरबार जिल्ह्याच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे.
या कामगिरीबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री.किशोर कानिटकर, उपाध्यक्ष मा.श्री.सतिश गायकवाड, सचिव मा.श्री.रविंद्र शिराळकर, खजिनदार मा.श्री.सतिश धोकटे, संचालक मा. श्री.ऋषिकेश घारे, सर्व संचालक मंडळ, आचार्य श्री.हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक- श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख सौ.स्नेहल भिडे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन केले.