बारामती मध्ये जनजागरण यात्रेचे भव्य स्वागत
फलटण टुडे (बारामती ): –
कामगार, शेतकरी, महिला,विद्यार्थी,बेरोजगार व कष्टकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन संविधान चे संरक्षण करीत शासनाने न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र आयटक चे सरचिटणीस कॉम्रेड श्यामजी काळे यांनी केली.
महाराष्ट्र आयटक च्या वतीने आयोजित राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा शुक्रवार १ डिसेंम्बर रोजी बारामती मध्ये आली असताना श्यामजी काळे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
या प्रसंगी कॉ. बबली रावत राष्ट्रीय सेक्रेटरी आयटक, कॉ.राजू देसले सेक्रेटरी महाराष्ट्र आयटक
कॉ.सदाशिव निकम सचिव महाराष्ट्र आयटक,ग्रीव्हज कॉटन अँड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियन (पियाजो युनिट ) संघटनेचे सहजनरल सेक्रेटरी कॉ. तानाजी खराडे, सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम चौधर, managing कमिटी सदस्य कॉ. अशोक इंगळे, हनुमंत गोलांडे व सुनील शेलार , बारामती तालुका कामगार कृती समिती अध्यक्ष नानासाहेब थोरात, उपाध्यक्ष भारत जाधव ,कार्याध्यक्ष तानाजी खराडे ,सरचिटणीस गुरुदेव सरोदे, खजिनदार रंजीत भोसले, सह सरचिटणीस रमेश बाबर, सह खजिनदार मनोज सावंत, सदस्य अजित भांडवलकर ,श्रीकांत कदम, बारामती तालुका अंगणवाडी बालवाडी कर्मचारी एम्प्लॉईज युनियनच्या नेत्या आशाबी शेख , पूना एम्प्लॉईज युनियनचे यशश्री टेक. प्रा. लि. व वॉलमोट
इंदापूर चे युनियन युनिट अध्यक्ष कॉम्रेड लालासो ननावरे, युनियन पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौन्सिल यांच्या वतीने राज्यव्यापी महासंघर्ष जनजागरण यात्रा २0 नोव्हेंबर ते १८ डिसेंबर पर्यंत होणार असून कोल्हापूर ते नागपूर पर्यंत हा प्रवास होत असताना कष्टकरी जनतेला न्याय मिळावा
संविधानाच्या संरक्षणासाठी, कामगार,शेतकरी, मजूर,बेरोजगर ,महिला च्या न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदी विषयावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करीत असताना सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला. कॉम्रेड तुकाराम चौधर यांनी सूत्रसंचालन केले.
आभार कॉ. तानाजी खराडे यांनी मानले