३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

धाराशिव, सांगली व साताऱ्यासह मुंबई, मुंबई उपनगर व ठाण्याचे दोन्ही संघ बाद फेरीत

फलटण टुडे ( पालघर १, डिसेंबर) : –
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने ३८ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन के. डी. हायस्कूल, चिंचणी, पालघर येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज किशोरांमध्ये धाराशिव, रत्नागिरी, बीड, नाशिक, सांगली, सातारा तर किशोरींमध्ये धाराशिव, पुणे, सांगली, सातारा व सोलापूरने विजय मिळवत बाद फेरी गाठली.  

किशोरांमध्ये धाराशिवने यजमान पालघरचा १२-४ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात धाराशिवचे हारद्या वसावे (४.५० मि. संरक्षण व ३ गुण), पिंटू वळवी (३.२० मि. व १ गुण) भिमसिंग वसावे (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण) तर पराभूत पालघरचा यशराज जाधव (१.४०, १.१0 मि. संरक्षण व १ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.

किशोरांमध्ये साताऱ्याने मुंबई उपनगराचा ११-८ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात साताऱ्याच्या प्रथमेश कुंभार (२.३० मि. संरक्षण व ४ गुण), शरद उबाळे (नाबाद २.२० मि. संरक्षण व १ गुण), मयूर जाधव (१.१०, नाबाद १.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी तर उपनगराच्या पंकज यादव (१.२० मि. संरक्षण) व तन्मय पुजारे (३ गुण ) यांनी बहारदार खेळ केला.

किशोरांमध्ये रत्नागिरीने जळगावचा १७-७ असा १० गुणांनी पराभव केला. विजयी रत्नागिरीच्या कारण बलाडे (३.३०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), कार्तिक सावंत (२ मि. संरक्षण व ५ गुण), प्रसाद पाष्टे (२.१० मि. संरक्षण व १ गुण) तर पराभूत जळगावच्या दिपेश माळी (३.३० मि. संरक्षण व २ गुण), आर्यन पवार (१.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण) सामन्यात वर्चस्व राखले.       

किशोरींच्या सामन्यात पुण्याने लातूरचा ११-९ असा ५.३० मि. राखून २ गुणांनी विजय मिळवला. या सामन्यात पुण्याच्या अक्षरा ढोले (नाबाद ३:३०, २ मि. संरक्षण व १ गुण), धनश्री लाव्हाटे (३.३० मि. संरक्षण व २ गुण) व अपर्णा वर्धे (३ गुण) यांनी विजयात मोठा वाट उचलला. तर पराभूत लातूरच्या अस्मिता शिंदे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) हिने एक हाती लढत दिली.

किशोरींमध्ये साताऱ्याने मुंबईचा १५-११ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला. यात या सामन्यात साताऱ्याच्या गौरी जाधव (२.५०, ३.२० मि. संरक्षण व ४ गुण), वेदिका जाडकर (२.१० मि. संरक्षण व १ गुण), इशिता लांडगे (२.२० मि. संरक्षण) यांनी विजय निश्चित केला. तर मुंबईच्या कादंबरी तेरवणकर (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), सोनम शेलार व शार्वी नाडे (प्रत्येकी २-२ गुण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या मुंबईला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.  


किशोरांच्या इतर सामन्यात बीडने धुळ्याचा ६-५ असा ४.१० मि राखून पराभव केला. नाशिकने छ. संभाजी नगराचा ११-१० असा १ मि. राखून पराभव केला. तर सांगलीने नगराचा १४-१२ असा चुसाशीच्या सामन्यात पराभव केला.

किशोरींच्या सामन्यात धाराशिवने मुंबई उपनगराचा १९-४ असा एक डाव राखून पराभव केला. सांगलीने परभणीचा ८-५ असा एक डाव राखून पराभव केला. तर सोलापूरने नंदुरबारचा १३-९ असा पराभव केला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!