वंजारवाडी मध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब विजयी
फलटण टुडे (बारामती ): –
वंजारवाडी येथे भैरवनाथ चषक वंजारवाडी २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये प्रथम क्रमांक
भैरवनाथ क्रिकेट क्लब द्वितीय शिवरत्न विनर्स क्लब तृतीय अकोले क्रिकेट क्लब व चतुर्थ विजय बापू चौधर इलेव्हन क्लब यांनी विजेतेपद पटकाविले.
मॅन ऑफ द मॅच अभिजीत चौधर, बेस्ट बॉलर विजय चौधर व बेस्ट बॅट्समॅन अभि चौधर यांनी देण्यात आले.
क्रिकेट वनडे टेनिस सामन्या चा शुभारंभ व बक्षीस वितरण समारंभ वंजारवाडी चे मा.उपसरपंच विनोद चौधर यांच्यासोबत हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन चौधर, प्रताप गोफने, हरिभाऊ चौधर,
आकाश सूर्यवंशी, निलेश शिंदे, राजेंद्र महादेव चौधर, प्रदिप ज्ञानदेव चौधर व या स्पर्धेचे आयोजक विजय भाऊ चौधर उपस्तीत होते.
ग्रामीण भागातील खेळाडू च्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी व खिलाडू वृत्ती जोपासली जावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून सदर स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करत असल्याचे विनोद चौधर यांनी सांगितले.
————————-