चौकट:
हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेले द्वारकामाई पालखी रथ दांडपट्टा मर्दानी खेळ हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेल्या बाहुबली हनुमान व शंकर महाकाल ची हुबेहूब प्रतिकृतीत साकारलेले कलाकारांनी कला प्रदर्शित केली.
तर ‘एकच वादा अजित दादा’ वाक्ये असलेले फेटे साई भक्तांना तर चमकीचे आकर्षक ‘राष्ट्रवादी’ लिहलेले फेटे मान्यवरांना असल्याने साई भक्ती बरोबरच अजित दादा यांच्या बदल असलेली निष्ठा या फेटेच्या माध्यमातून दिसत होती.
साई बाबांचे विचार आजही प्रेरक: सुनेत्रा पवार*
बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग बाराव्या वर्षी साई पालखी सोहळ्याचे आयोजन
फलटण टुडे (बारामती ):
साई बाबा पालखी सोहळ्यातून साई बाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होत आहे. साई बाबांचे विचार आचरणात आणल्यास मनुष्य जीवन समाधानी व आनंदी राहू शकते अध्यात्मिक ताकद देण्यासाठी साई बाबांचे विचार आजही प्रेरक असल्याचे प्रतिपादन बारामती हाय टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचा शुभारंभ करताना सुनेत्रा पवार बोलत होत्या या प्रसंगी मा. नगरसेवक किरण गुजर,मा. नगराध्यक्षा भारती मुथा व अनिता जगताप , राजेंद्र बनकर,शिर्डी राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष सोनू कुलकर्णी, राष्ट्रीय श्रीराम संघ तालुका अध्यक्ष पै. मदनभाऊ मोकाटे, आर पी आय नगर जिल्हा अध्यक्ष सुमनभाऊ जगताप, निमगाव उपसरपंच मछिंद्र वदक , शनी शिंगणापूर सरपंच रमेश सोनावणे , घारगाव चे उद्योजक मनीष खुराणा ,शब्बीर शेख, तैनूर शेख, मिलिंद संगई,सुनील शिंदे , शब्बीरभाई बारामतीवाला, डॉ. सौरभ मुथा, व इतर मान्यवर उपस्तीत होते.
पायी पालखी सोहळ्यातून व्यसनमुक्ती व पर्यावरण,स्वछता चे आदर्श काम होत असल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी समाधान व्यक्त करून बारामती चा आदर्श पालखी सोहळा असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
बिरजू मांढरे यांनी गोर गरीबांची सेवा करून व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा डॉ आंबेडकर वसाहत चे काम पूर्ण करून खरी साई सेवा केल्याचे मा. नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.
“१२ वर्षा पूर्वी मोजक्याच साई भक्ता समवेत सुरू केलेला सोहळा या वर्षी ३ ते ४ हजार भाविक सहभागी होत आहेत ,बारामती तालुक्यातील पहिलाच साई विचारांचा पायी सोहळा असून भक्ती बरोबरच पर्यावरण वाढवा व व्यसन मुक्ती , गावोगावी स्वछता अभियान, वृक्षरोपण व प्रबोधन करणारा पायी पालखी सोहळा असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार मा. नगरसेविका शोभाताई मांढरे यांनी मानले.
समाजभूषण भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार, लहुजी वस्ताद दहीहंडी संघ, कै. श्रीहरीभाऊ तेलेंगे मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.