फलटण टुडे (मुंबई,क्री. प्र.) १६ नोव्हें. : –
उद्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पुरुष व महिलांच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबई खो-खो संघटनेचे सचिव सुरेंद्र विश्वकर्मा यांनी पुरुष व महिला संघ जाहीर केला असून हा संघ परभणीला रवाना झाला आहे. या संघांच्या कर्णधारपदी ओम समर्थच्या शुभम शिगवण व शिवनेरीच्या प्रतीक्षा महाजन यांची निवड झाली आहे.
पुरुष संघ: शुभम शिगवण (कर्णधार) (ओम समर्थ भा. व्या. मंदिर), वेदांत देसाई, पियुष घोलम, यश बोरकर, (श्री समर्थ व्या. मंदिर), सम्यक जाधव, शुभम शिंदे, आयुष गुरव, (विध्यार्थी क्रीडा केंद्र), सिद्धेश चोरगे, आदेश कागडा, अजय मित्रा, (अमरहिंद मंडळ), राहुल जावळे, प्रसाद पठाडे, चैतन्य धुळप (उपकर्णधार), श्रेयस राऊळ, रोहन टेमकर, (सरस्वती स्पो. क्लब), गुरुदत्त शिंदे (प्रशिक्षक), सुधाकर राऊळ (व्यवस्थापक).
महिला संघ: प्रतिक्षा महाजन (कर्णधार), मयुरी लोटणकर, ऐश्वर्या पिल्ले (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), प्राजक्ता ढोबळे, श्रीया नाईक (सर्व श्री समर्थ व्या. मंदिर), खुशबू सुतार, सेजल यादव (उपकर्णधार), नम्रता यादव, नताशा नतापे (सर्व सरस्वती कन्या केंद्र), संजना कुडव, रिद्धी कबीर, मधुरा पेडणेकर (अमरहिंद मंडळ), ईशाली आंब्रे, वैष्णवी परब, रश्मी दळवी, (ओम साईश्वर सेवा मंडळ), रुपेश शेलटकर (प्रशिक्षक), सौ. प्राची गवंडी (व्यवस्थापिका).