फलटण टुड (बारामती) : –
बारामती तालुक्यातील सावळ येथील
विद्यार्थ्याना आपली संस्कृति व परंपरा यांची ओळख व्हावी व ही संस्कृति व परंपरा पुढच्या पिढीकडे संक्रमित व्हावी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली शुभेच्छा पत्रे शिक्षकांना देऊन शुभेच्छा दिल्या
.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री दत्तात्रय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली.यावेळी ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते, निलम जगताप ,सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.