फलटण टुडे (सातारा, दि. 5 ) :
जिल्ह्यातील स्थानिक केबल वाहिन्यांवरुन प्रसारित होणाऱ्या खासगी वृत्त आणि मनोरंजन वाहिन्यांकडून केंद्र शासनाच्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स ऑण्ड रेग्युलेशन ॲक्ट 1995 मधील तरतुदींचे पालन होत नसल्यास याची माहिती जिल्हा संनियंत्रण समितीकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
जिल्हा पातळीवरील खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी गठित केलेल्या जिल्हासतरीय संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, समिती सदस्य शिवलिंग मेनकुदळे, ॲङ मनिषा बर्गे, सविता साबळे. तुषार तपासे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व खासगी केबल वाहिन्या नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत नसलेल्या व अनधिकृतरीत्या प्रसारित होत असलेल्या वाहिन्यांची माहिती असल्यास नागरिकांनी ती जिल्हास्तरीय समितीला द्यावी. सर्व केबलवरुन प्रसारित होत असलेल्या व स्थानिक खासगी वाहिन्यांनी प्रसारणास आवश्यक ते परवाने मिळवून नोंदणी करुन घ्यावी..
कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निर्दशनास आल्यास त्याबाबतची माहिती आवश्यक त्या पुराव्यांसह लेखी स्वरुपात जिल्हा माहिती अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, एसटी स्टॅण्डशेजारी , सातारा येथे द्यावी.