उद्या फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे क्रिकेट अकॅडमी चे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन

फलटण टुडे (फलटण दि २२) :-
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आणि क्रिकेट अॅकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट अॅकॅडमी चे दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर रविवार पेठ फलटण येथे माजी विधान परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा विद्यमान सदस्य विधान परिषद मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी रणजी कर्णधार ८८ प्रथम श्रेणी सामने खेळलेले व सध्या महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक व १९ वर्षाखालील निवड समितीचे अध्यक्ष मा. मिलींद गुंजाळ व पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा महाराष्ट्राचे माजी क्रीडा आयुक्त मा.ओम प्रकाश बकोरिया हे असणार आहेत

या कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार मा. दिपकराव चव्हाण , फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर , सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव घोरपडे , प्रशासन अधिकारी मा. अरीवंद निकम , प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य उपस्थित राहाणार आहेत .

या अकॅडमी मध्ये १० वर्षापासून पुढे ज्यांचे वय आहे अशा विद्यार्थांना या क्रिकेट अकॅडमी मध्ये सहभाग नोंदवता येईल . याअकॅडमी मध्ये क्रिकेट प्रशिक्षणाबरोबर आहार, जीवन कौशल्ये आणि मानसिक कणखरता यावर विशेष व्याख्याने दिली जातील

अॅकॅडमी मधे खालील प्रमणे वैशिष्ट्ये असणार आहेत खेळाडूंना सरावासाठी पाच सराव खेळपट्ट्या उपलब्ध केल्या गेल्या आहेत. तसेच व्यायामासाठी सुसज्ज व अत्याधुनिक जिम तसेच स्वतंत्र चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे . तसेच प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक, भारतीय संघातील खेळाडू, रणजी संघातील खेळाडू, फिटनेस तज्ञ आणि योगा प्रशिक्षक यांच्याकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे व विविध स्पर्धा आणि सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे
या क्रिकेट अँकॅडमी ची सरावासाठी ची वेळ सकाळी ७.०० ते ९.०० तर सायंकाळी ४.०० ते ६.०० अशी असणार आहे अशी माहिती क्रिकेट अॅकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली आहे .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!