अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकलंगे येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय हॉलीबॉल महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास तृतीय क्रमांक संपादन केला.बाद व साखळीफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर,
अण्णासाहेब डांगे महाविद्यालय,हातकलंगे,
बाबासाहेब चितळी महाविद्यालय,भिलवडी,
देवचंद कॉलेज,अर्जुननगर या संघावरती सरळ सेटमध्ये विजय मिळवत
उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्यफेरीमध्ये के. आर.पी.कन्या महाविद्यालय इस्लामपूर बरोबर 25-22,15-25,15-13 ने हार पत्करावी लागली.
या संघामध्ये श्रद्धा शिंदे, अर्पिता गायकवाड,वैष्णवी फडतरे, साक्षी गायकवाड,
श्रद्धा निंबाळकर, शिवानी शिंदे, साक्षी शिंदे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचेअधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले.