सकारात्मक राहून कॅन्सर वर विजय शक्य : ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू

कारवार एव्हीशन मध्ये विमान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

फलटण टुडे (बारामती ) :-
सकारत्मक रहा, तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करताना आवश्यक गरजा पूर्ण करा परंतु प्रमाणा पेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका आनंदी व सकारत्मक जीवनशैली मधून कॅन्सर वर सुद्धा सहज मात करता येते असे प्रतिपादन प्रख्यात आर्मी टेस्ट पायलट आणि कॅन्सर वर यशस्वी मात केलेले , 
निवृत्त ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू यांनी केले.
शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी कारवार एव्हीएशन अकॅडमी यांच्या वतीने विमान क्षेत्रातील ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी कारवार एव्हीएशन चे संचालक नेव्हील भरूच्या , वरिष्ठ व्यवस्थापक प्रमेश पारेख, विमान प्रशिक्षक दीपांशू कुमार , माधवराज सिंग , अभियंता मयूर जगताप, अलोक ओझा, समनव्यक अधिकारी वैभव शहा, चंद्राणी रे आदी अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपस्तीत होते.

कॅन्सरवर विजय मिळवणे हे कॉकपिटमधील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यापेक्षा वेगळे नाही ,कॅन्सर झाल्यावर मानसिक खंबीर रहा,कॅन्सर दवा , दुआ व योगा च्या माध्यमातून बरा होऊ शकतो यावर विश्वास ठेवा त्याचा बाऊ करू नका सकारत्मक जीवनशैली ठेवल्यास कॅन्सरवर सहज व नक्की विजय मिळवून नवीन जीवन प्राप्त होऊ शकते त्याच प्रमाणे 
झटपट श्रीमंत व सर्व अपेक्षा पूर्ण होण्याचे स्वप्न पुरे करताना तणाव निर्माण होतो त्यामुळे कॅन्सर पेशी निर्माण होण्यास मदत होते त्या मुळे जीवनात तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा असेही सिद्धू यांनी सांगितले.
ऑन ड्युटी असताना वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सर असताना मात करून पुन्हा यशस्वी पणे कर्तव्य पूर्ण केले त्यानंतर सेवा निवृत्ती हे सिद्धू यांचे वैशिष्ट्य असल्याचे अकॅडमी चे समनव्यक वैभव शहा यांनी सांगितले.

 *सिद्धू यांच्या विषयी* 
आर्मी एव्हिएशन कॉर्प्स चे 64 वर्षांचे प्रतिष्ठित भारतीय लष्कराचे दिग्गज, आणि त्यांच्या लॉग बुकमध्ये जवळपास 8000 फ्लाइंग तास आणि 53 विमानांचे प्रकार असलेले प्रायोगिक चाचणी पायलट.  
1965 आणि 1971 च्या भारत पाक युद्धादरम्यान भारतीय सैन्यासोबत उड्डाण केलेल्या विंटेज भारतीय निर्मित पुष्पक विमानाचे नूतनीकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 2011 मध्ये एएसीच्या 25 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये त्याने तिला देशभरातील युद्धांशी संबंधित सर्व ऐतिहासिक हवाई तळांवर उड्डाण केले. पुन्हा एकदा 1965 च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवादरम्यान सप्टेंबर 2015 मध्ये अशीच मोहीम हाती घेण्यात आली.
2014 मध्ये, त्याला स्टेज 4 नॉन हॉजकिन्स लिम्फोमा असल्याचे निदान झाले. कॉकपिटमधली ही दुसरी आणीबाणी म्हणून हाताळत, त्याने आपल्या डॉक्टरांवर आणि औषधांवर पूर्ण विश्वास ठेवला. परम इच्छाशक्तीच्या जोरावर ते नऊ महिन्यांच्या मनाने पुन्हा कॉकपिटमध्ये परतला. तेव्हापासून तो सक्रियपणे उड्डाण करत आहे आणि सूचना देत आहे, त्याच्या फोलिओमध्ये तीन विमान प्रशिक्षण मधील पायलट परवाने देखील जोडले गेले आहेत.

चौकट: 
केवळ विमान पायलट,अभियंते कारवार एव्हीएशन अकॅडमी बनवत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवत असताना कॅन्सर पासून मुक्तता मिळवलेल्या ब्रिगेडियर ला ‘प्रेरक व्याख्यान’ साठी बोलावून विद्यार्थ्यांना वैचारिक खुराक देणारी भारतातील एकमेव अकॅडमी असल्याचे ब्रिगेडियर सिद्धू यांनी संगीतले.



————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!