फलटण टुडे (फलटण) :
फलटण येथील सर्वात जुन्या अशा मंडळांपैकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गजानन चौक फलटण हे मंडळ नेहमीच नव – नवीन उपक्रम आयोजित करण्यात नेहमीच आग्रेसर असते. यंदाच्या वर्षी प्रथमच या मंडळाने महिलांकडून गणेश अथर्वशीर्ष चे पठण आणि त्यांच्या हस्ते आरती करण्याचा मान देण्यात आला.
यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांच्या घरातील महिलांनी व इतर परीसरातील महिलांनी सहभाग नोदवीला या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय अशी होती . यावेळी फलटण क्रेडाई वूमेन्स विंग यांचीही उपस्थिती लाभली.
या सगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी महिलांनी शंभरहून अधिक प्रतिसाद दिल्यामुळे मंडळांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले व महिलांचा मंडळातर्फे यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला व सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले .
या कार्क्रमाचे नियोजन मंडळाच्या सभासद सौ. प्रियांका निकम, सौ. कोमल निकम, सौ. जयश्री निकम, सौ कोमल शिंदे, सौ ज्योती पालखे यांच्या वतीने करण्यात आले होते. यापुढेही असे नव – नवीन उपक्रम हाती घेण्याचा मानस मंडळाच्या महिला सदस्यांनी बोलून दाखविला .