मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी
आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या पाचव्या वर्धापन व शिक्षकदिना निमित्त
पर्यावरण, सामाजिक, कला,साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ज्ञानसागर गुरुकुल सावळचे कलाशिक्षक श्रीराम सावंत यांना गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्री देवा तांबे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी पुणे शहर शिक्षक संस्थेचे पदाधिकारी व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्तीत होते.
ज्ञानसागर गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक बिबे, सी.ई.ओ. संपत जायपत्रे, प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे , नीलिमा देवकाते, राधा नाळे व सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सावंत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.