*
फलटण टुडे (बारामती ):
५ सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जि प प्राथमिक शाळा काटेवाडी मध्ये संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसराचे सुशोभीकरण करून ,प्रत्येक शिक्षकांना भगवा फेटा बांधून पुष्पवर्षाव करून व औषण करून शालेय आवारात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संपत गावडे , विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर , केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात, विषयतज्ञ सौ वैशाली रसाळ, मा. राजेंद्र काका पवार व विद्याधर काटे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पांडुरंग कचरे तंटामुक्ती मा.अध्यक्ष के.टी. आप्पा जाधव ,रामभाऊ ठोंबरे अमोल काटे , शितल काटे , धीरज घुले , समीर मुलानी, ,नितीन भिसे , दूधसंघ संचालक, संजय शेळके , अजित काटे , युवराज काटे , राजेंद्र मासाळ , सचिन मोरे , विशाल सुतार , दिलीप गरदडे , सागर भिसे , दत्तात्रय दळवी , संदीप दळवी , सचिन भिसे , गोकुळ टांकसाळे व गजानन हगवणे व नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय काळे उपाध्यक्ष पुनम सोनवणे सौ गौरी जगताप श्री शरद देवकाते श्री सचिन यादव , मुख्याध्यापिका राणी ढमे उपशिक्षिका नर्मदा शिंदे गीतांजली देवकर जयश्री चांगण संतोष सातपुते सोनाली तांदळे बापू तांदळे लीना दळवी व वनिता जाधव तसेच शाळेचे माजी शिक्षक सौ वनिता सोडमिसे धनपाल माने प्रीतम सातपुते व अण्णा ढमे आदी शिक्षकांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच संध्याकाळी मला संध्या काळे सारिका खोमणे सुषमा लोंढे आदी मान्यवर उपस्तीत होते या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.