फलटण टुडे (बारामती ):
जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुषपणे जो लाठी हल्ला केला त्याचा शनिवार २ सप्टेंबर २०२३ रोजी बारामती शहरात विविध मराठा संघटनांच्या वतीने प्रशासनास निवेदन देऊन व लाठीमार करणाऱ्यांचा
जाहीर निषेध करण्यात आला
याप्रसंगी सकल मराठा समाज, अखिल भारतीय मराठा महासंघ,हिंदू राष्ट्र सेना, शिवजयंती महोत्सव समिती, मराठा सेवा संघ , व इतर संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी महिला, पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार भाऊसाहेब करे व पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांनी निवेदन स्वीकारले .
या प्रसंगी विविध घोषणा देऊन लाठीमार करणाऱ्या चा निषेध करताना आंदोलक यांच्यावर लाठीमार करण्याऱ्या चा शोध घ्यावा व अटक करावी व राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण करत समाज्याची दिशाभूल करू नये असे मनोगत मध्ये पदाधिकारी यांनी सांगितले