फलटण टुडे (फलटण) :-
संत सोपानकाका सहकारी बँक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षणप्रेमी, सहकाररत्न स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्याजयंतीनिमित्त पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री.संजय जगताप यांच्या संकल्पनेतून “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” हा उपक्रम राबवून विभाग व जिल्हास्तरावरील शाळांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा इत्यादी बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना या पुरस्काराने सन्मानीत केले जाते.
यंदाचा २०२२ /२३ चा संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण या विद्यालयास तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला आसून. सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षामध्ये संत सोपानकाका सहकारी बँक मर्या. सासवड व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयामध्ये संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियान राबविण्यात आले होते. या अभियानामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सहभाग घेवून फाऊंडेशनने ठरविलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे . या पुरस्कारासाठी रोख तीन हजार रुपये व सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे पुस्कररचे स्वरुप असून तो सातार येथे प्रदान करण्यात आला .
तालुकास्तरीय स्वच्छ व सुंदर शाळेचा मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण या विद्यालयास पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषद चे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,अधीक्षक श्रीकांत फडतरे ,शाळा तपासणीस दिलीप राजगुडा व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य यांनी स्वच्छा व सुंदर शाळा हा पुरस्काराबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .